शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..श्रावण महिना 'या' दिवसापासून होतोय सुरू! यंदा श्रावणी सोमवार किती? धार्मिक महत्त्व, तिथी, संबंधित माहिती...

𝙰𝙳𝙷𝙸𝚁𝙰𝚅𝙴𝚁𝚂𝙴 • 𝙽𝙴𝚆𝚂 𝙳𝙴𝚂𝙺
0

 


अधिक मास संपला...आता उत्सुकता आहे ती म्हणजे श्रावण महिन्याची..हिंदू धर्मात, श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवाची भक्ती, पूजा आणि उपवासासाठी समर्पित आहे. असा विश्वास आहे की श्रावण महिन्यात शिवाची मनापासून पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. म्हणूनच शिवभक्त वर्षभर श्रावणाच्या आगमनाची वाट पाहतात. तर, शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, 2026 वर्षातील श्रावण महिना कधी सुरू होणार? याची उत्सुकता लवकरच संपणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की श्रावण कधी सुरू होईल आणि या वर्षी श्रावण महिन्यात किती सोमवार येतील, तर येथे श्रावण महिन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या...

भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना म्हणून श्रावण महिना असल्याचे मानले जाते. हा महिना लवकरच सुरू होणार असल्याने शिवभक्तीत लीन होण्यासाठी देशभरातली लाखो भक्त सज्ज झाले आहेत. कारण लवकरच श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावण महिना सुरू होताच मंदिरांमध्ये 'बम बम भोले'चा जयघोष  पाहायला मिळतो. वैदिक पंचांगानुसार, 2026 मधील श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. भगवान शिवाला समर्पित असलेला हा पवित्र महिना भक्ती, ध्यान आणि उपवासासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात शिवभक्त भक्तीभावाने भगवान शिवाची पूजा करतात, जलाभिषेक करतात आणि कावड यात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

श्रावण महिन्यात यंदा किती सोमवार आहेत? धार्मिक महत्त्व काय?

धार्मिक मान्यतेनुसार, संपूर्ण श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, परंतु सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने भक्त या दिवशी उपवास करतात.

2026 च्या श्रावण महिन्यात किती सोमवार येतील?



2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 3 सोमवार असतील. या काळात भाविक या सोमवारी उपवास करू शकतात आणि भगवान शिवाची विशेष प्रार्थना करू शकतात.

पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 7 सप्टेंबर

 







    धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे, या काळात भक्त भगवान शिवाची पूजा करतात. या काळात शिवलिंगावर गंगाजल, दूध आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. अभिषेक केल्यानंतर महादेवाला 11 किंवा 21 बेलपत्र, चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. मानसिक शांततेसाठी या काळात महामृत्युंजय मंत्राचा पठण करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते...


        








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)