Chanakya Niti: या ठिकाणांहून निघताना मागे वळून पाहू नका, अन्यथा वाढू शकतात अडचणी!

                                                    चाणक्य 


 

आचार्य चाणक्य यांचे विचार समाजाला नेहमी प्रेरणा आणि पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास देत असतात. जीवनात प्रगती करायची असेल तर चाणक्य यांचा नीतिशास्त्र ग्रंथ आवर्जून वाचायला हवा. यामध्ये सखोल ज्ञानासह व्यवहारिक ज्ञान उत्तम प्रकारे देण्यात आलेले आहे. चाणक्य नीतीनुसार काही विशिष्ट ठिकाणांहून परत येताना मागे वळून पाहिल्यास जीवनात मोठं संकट येतं किंवा काहीतरी वाईट घडतं.प्राचीन भारतातील महान आचार्य चाणक्य यांना शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार म्हणून ओळखले जाते. त्यांनी मांडलेल्या विचारांचा आणि तत्त्वांचा संग्रह म्हणजे नीतिशास्त्र ग्रंथ! जीवनाला योग्य दिशा देणारे व्यावहारिक धडे यामध्ये दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीची वागणूक, यश, नातेसंबंध, संपत्ती, राजकारण आणि जीवनातील व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन यात केलेले आहे. यामध्येच नमुद केले आहे की, काही ठिकाणांहून आपले काम पूर्ण करून निघताना मागे वळून पाहू नये. असे मानले जाते की, अशा ठिकाणी मागे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येऊ शकते किंवा कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 नक्की ती ठिकाणे कोणती आहेत? चला जाणून घेऊयात.

                          प्राचीन भारतातील महान आचार्य चाणक्य यांना शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार म्हणून ओळखले जाते. त्यांनी मांडलेल्या विचारांचा आणि तत्त्वांचा संग्रह म्हणजे नीतिशास्त्र ग्रंथ! जीवनाला योग्य दिशा देणारे व्यावहारिक धडे यामध्ये दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीची वागणूक, यश, नातेसंबंध, संपत्ती, राजकारण आणि जीवनातील व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन यात केलेले आहे. यामध्येच नमुद केले आहे की, काही ठिकाणांहून आपले काम पूर्ण करून निघताना मागे वळून पाहू नये. असे मानले जाते की, अशा ठिकाणी मागे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येऊ शकते किंवा कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
    1. स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारावरून परतताना
एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर थेट घरी जावे आणि चुकूनही मागे वळून पाहू नये. स्मशानभूमीत शोक आणि नकारात्मकतेचे वातावरण असल्यामुळे जर तुम्ही मागे वळून पाहिले तर त्या दुःखाशी किंवा मोहाशी पुन्हा जोडले जाण्याची भीती असते.                   
  2. पैसे उधार देऊन किंवा मदत करून परतल्यानंतर
जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला आर्थिक मदत केली किंवा पैसे उधार दिले असतील, तर तिथून निघताना वारंवार मागे वळून पाहू नये. तुम्ही जर मागे वळून पाहिलेत तर तुमच्या मनात त्या पैशांबद्दल शंका, लोभ किंवा पश्चात्ताप असल्याचे दिसून येते. खरी मदत किंवा दान जेव्हा आपण करतो तेव्हा ती लगेच विसरून जायला हवी.

3. कोर्ट किंवा एखाद्या ठिकाणाहून भांडण मिटवून परतताना
जर आपण एखाद्या कायदेशीर प्रकरणातून, कोर्टातून किंवा एखादा मोठा वाद सोडवून परतत असाल, तर मागे वळून पाहू नये. चाणक्य नीतीनुसार असे करणे म्हणजे त्या वादातून आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे मुक्त झालेलो नाही, असे मानले जाते. 


4. दुष्ट किंवा कपटी व्यक्तीचे घर सोडल्यानंतर
जर एखादी व्यक्ती स्वभावाने दुष्ट, कपटी किंवा तुमचा मत्सर करणारी असेल तर त्या व्यक्तीचे घर किंवा सहवास सोडताना मागे वळून पाहू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा व्यक्तींपासून जितक्या लवकर आणि सहज दूर जाता येईल तितके चांगले आहे. दृष्ट आणि कपटी लोकांचे घर सोडताना किंवा त्यांच्यासोबत संबंध तोडल्यानंतर मागे वळून पाहणे म्हणजे त्या व्यक्तीशी अनावश्यक आपलेपणा किंवा दुर्बलता दिसून येते, ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा तुम्हाला त्रास देवू  शकते.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या